भुसावळ । लोकमान्य टिळक यांनी आपल्या लिखाणाद्वारे तत्कालिन इंग्रज सरकारविरुध्द लढा उभारुन देशातील तळागाळातील सर्वसामान्यांना जागरुक करण्याचे कार्य केले. त्यांच्या या प्रेरणेतूनच पुढे अनेक क्रांतीकारक निर्माण होवून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वाचे योगदान दिले.
त्यामुळे लोकमान्य टिळक यांच्या कार्यातून आजच्या तरुण पिढीने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जे.बी. कोटेचा यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागातर्फे शहरातील राजीव गांधी वाचनालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. नितीन पटाव, विवेक नरवाडे, कल्पना तायडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, माजी आमदार निळकंठ फालक, फकरुद्दीन बोहरी, दलितमित्र लालाजी ढिवरे, अॅड. एम.एस. सपकाळे, यु.एल. जाधव, विजय नरवाडे, विशाल नरवाडे, राजेंद्र पटेल, प्रविणसिंग पाटील, प्रदिप नेहेते उपस्थित होते.