लोकमान्य टिळकांना अभिवादन

0

निंभोरा। येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये लोकमान्य टिळकांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक दिलशाद यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले व लोकमान्य टिळक यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी भाषणे दिली. यामध्ये यश बर्‍हाटे, अविनाश सोनार, रोहित सोनवणे, उमर शेख, मयुरी मोरे, डिंपल चौधरी, उत्पल तायडे, निलेश पवार, रेणुका पाटील, रिया पवार या विद्यार्थ्यानी भाषणे दिली.

वेदिका बोरनारे, अनुष्का चौधरी, सुजान शेख, भावेश कोळंबे, भावेशा सरोदे, धृव बारी यांनीही भाषणे दिली. प्रास्ताविक रितेश पाटील तर आभार चैतन्य कोंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, दिपक सोनवणे, जयश्री उबेरकर, जयश्री चौधरी, जयश्री बोरनारे, आशा इंगळे, प्रिती भंगाळे यांनी सहकार्य केले.