लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे सात डब्बे रूळावरून घसरले, ४० प्रवासी जखमी

0

ओडिसा : ओडिसा येथील कटकमध्ये असलेल्या नरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात ४० प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई, भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिन्स एक्स्प्रेसचे जवळपास ७ डब्बे रूळावरून घसरले आहेत. सकाळी सातवाजेच्या सुमारास ही घटना कटक येथील नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. यामध्ये ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रेल्वेचे डब्बे रूळावरू घसरण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र दाट धुक्यांमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेबाबत माहिती मिळाताच घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयांमध्ये हलवले जात आहे.