लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न

0

नेरुळ-: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, महापालिका मुख्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिमापूजन संपन्न झाले.

याप्रसंगी उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त आयुक्त (सेवा) रमेश चव्हाण, प्रशासन विभागाचे उप आयुक्त किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मुख्य लेखा परिक्षक डॉ. सुहास शिंदे, शहर अभियंता मोहन डगांवकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, सहा. संचालक नगररचनाकार मोमीन मोहम्मद ओवीस अझाज हुस्सेन, परवाना विभागाच्या उपआयुक्त तृप्ती सांडभोर, परिमंडळ 1चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, कनिष्ठ विधी अधिकारी अभय जाधव तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.