लोकमान्य हॉस्पिटलमध्ये भरघोस वेतनवाढीचा करार

0
पिंपरी : लोकमान्य हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य,  सुनील काळे, जनसंपर्क प्रमुख डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या समवेत राष्ट्रीय श्रमिक  संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भोसले व हॉस्पिटलमधील कामगार प्रतिनिधींनी वाटाघाटी केल्या. लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे वेतनवाढीचा करार करण्यात आला.
नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2021 या तीन वर्षाकरिता रक्कम रुपये आठ हजार ही थेट वेतनात वाढ मिळाली असून रक्कम रुपये बाराशे अप्रत्यक्ष वाढ तसेच एक लाख दहा हजार कर्मचार्‍यास व पंचाहत्तर हजार कामगारांच्या कुटुंबास वैद्यकीय सेवेसाठी मिळणार आहेत. कामगाराचा अपघात झाल्यास व्यवस्थापन विम्याचे स्वतंत्र प्रयोजन करण्यात येणार आहे. लोकमान्य हॉस्पिटलमधील कामगार प्रतिनिधी विठ्ठल ओझरकर, संजय साळुंखे, सुनील साळे, प्रमोद चव्हाण, नितीन कांबळे, सुजीत कुटे, हनुमंत जाधव, जाकीर मुलाणी, नवनाथ जगताप, सरस्वती शेलार, सारीका राऊत आदी वेतनावाढीच्या झालेल्या वाटाघाटीत सहभागी होते.
या करारामुळे प्रत्येक कर्मचार्‍याला दहा हजार रुपये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढ या करारात मिळाली आहे. या कराराचे फायदे लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथील 200 कर्मचार्‍यांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय मदतनीस व सफाई कर्मचारी तसेच तातडीच्या वैद्यकीय कर्मचारी यांचे वेतन थेट हातामध्ये तीस हजार रुपये पर्यंत मिळणार असल्याने कर्मचार्‍यांनी आनंद साजरा केला. संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी डॉ.नरेंद्र वैद्य यांचा सत्कार केला. भंडारा उधळून रुग्णांना फळे वाटून कर्मचार्‍यांनी आनंद उत्सव साजरा केला. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वेतन असणारे लोकमान्य हॉस्पिटल हा ग्रुप असून एवढे वेतन कर्मचार्‍यांना सध्या तरी कोठे नाही. राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील वैद्यकीय हॉस्पिटलमधील सर्वात मोठा करार असल्यामुळे लाखो कर्मचार्‍यांना  दिलासा मिळाला.