मुंबई । हार्बर रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास माहीमजवळ लोकलचे 6 डबे रूळांवरून घसरले. ही लोकल सीएसटीहून अंधेरीच्या दिशेने जात असतांना लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले. यात एका महिलेसह तीन प्रवासी जखमी झाले असून हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.गणेश चतुर्थीमुळे गणपती घरी आणणार्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.