लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

0

विरार । मंगळवारी रात्री महाविद्यालयातून घरी परतत असताना वसईतील मैत्री शहा या १७ वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. काल झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. त्यामुळे येईल ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. त्यात या तरूणीने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवाने बोरिवली-दहिसर दरम्यान दरवाजातून लोकलबाहेर पडली. मंगळवारी पश्‍चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जमली होती. लोकल सेवा उशिरा धावत होत्या, त्यामुळे येणार्‍या लोकल गाडीत चढण्यासाठी सर्वच प्रवाशी जीवाची बाजी लावत होते. अशा या गर्दीतून मैत्री शहानेही लोकल गाडी पकडली. मात्र मुबलक जागा उपलब्ध नसल्यामुळे तिचा तोल पडला आणि ती दुर्दैवाने लोकलमधून बाहेर पडली.