श्रीवर्धन । तालुक्यातील केंद्र दांडगुरी मधील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडगुरी लोकसहभागातून डिजिटल करण्यात आली. या डिजिटल शाळेचे उद्घाटन श्रीवर्धन तालुक्याचे उप सभापती बाबुराव चोरगे, गट शिक्षणाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित दांडगुरी स्थानिक शाळेचे अध्यक्ष सुधाकर शेलार, केंद्र प्रमुख पांगारकर सर, मुख्याध्यापक नावरे, नाझरे, ग्रामसेवक शंकर मयेकर व ग्रामस्थ मंडळाचे अशोक सावंत, माजी सरपंच प्रदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीवर्धन तालुका प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे याचे सर्व श्रेय आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांचे आहे आणि या उपक्रमासाठी जी जोड आजच्या काळात खूप गरज आहे ती म्हणजे कॉम्प्युटर प्रोजेक्टर ची आणि हि सर्व साधन सामग्री आपण सर्वांनी लोकवर्गणीतून मोठी मेहनत घेऊन केल्याने उप सभापती बाबु राव चोरगे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.
केंद्रातील एकूण नऊ शाळा झाल्या डिजिटल
उद्याच्या आदर्श पिढीला आपण शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जे सढळ हाताने सहकार्य केल्याबद्दल दांडगुरी ग्रामस्थ यांना केंद्रप्रमुख पांगारकर सरांनी धन्यवाद दिले तसेच दांडगुरी केंद्रातील एकुण नऊ शाळा डिजिटल झाल्या असे घोषित केले. नारकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच प्रदीप पवार यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उपस्थित साक्षी शेलार, वैशाली शिंदे, दर्शना जाधव, अशोक सावंत, अदिती आयरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.