लोकशाहिरांना सर्वत्र अभिवादन

0

भुसावळ । साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त भुसावळ शहर व तालुका शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख उमाकांत शर्मा यांनी केले होते. कार्यक्रम रेल कामगार सेनेच्या कार्यालयात संपन्न झाला.

पदाधिकारी, यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, नगरसेवक शहरप्रमुख मुकेश गुंजाळ, रेल कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष ललित मुथा, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन निळे, उपजिल्हाप्रमुख विनोद गायकवाड, युवासेना शहर अधिकारी मिलिंद कापडे, प्रा. धिरज पाटील उपस्थित होते. यावेळी उमाकांत शर्मा, अबरार शेख, राकेश खरारे, अरुण साळुंखे, बबलू बर्‍हाटे, गणेश काळे, अरुण धनगर, निखिल सपकाळे, राजेश ठाकुर, क्रिष्णा साळी, शुभम पचरवाल, शिवाजी दाभट, रोहित महाले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात प्रतिमा पूजन
येथील धनाजी नाना महाविद्यालयात मराठी विभागातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागातील प्रा.डॉ. सिंधू भंगाळे होत्या. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य व जीवन कार्यावर प्रकाश प्रा.डॉ. शरद बिर्‍हाडे यांनी टाकला. त्यांनी लोकशाहीर वारणेचा वाघ अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील मानाचे साहित्यिक आहे. त्यांच्या सकस साहित्याचा अनुवाद जगातील 27 भाषांमध्ये झाला आहे. त्यांनी जगण्यासाठी मरणार्‍या व मारणार्‍यांचे संवेदनशिल साहित्य लिहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचे कार्य मोलाचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्रा.डॉ. सिंधू भंगाळे यांनी संत तुकारामाप्रमाणेच तुकाराम साठे यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले. कष्टकरी जनतेला, मजुरांना स्वाभिमानाने जगायला शिकवले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. दिपक सुर्यवंशी यांनी तर आभार प्रा. सुजाता भंगाळे यांनी मानले.