खरंतर छत्रपती राजे शिवाजींचा उदोउदो करणारे नौटंकी भक्तही त्यात मागे राहिले नाहीत, ज्यांना खरा शिवाजी राजा कळला ते मात्र चलो बुद्ध की ओर म्हणत मानवतावादी ध्येयाकडे मार्गक्रमण करीत आहेत. माणूस जोडण्याचे काम करीत आहेत. परंतु, ज्यांना खरा शिवाजी कळलाच नाही ते मात्र सनातनी प्रवृत्तीला बळी पडत जात व्यवस्था टिकवू पाहत आहेत, ज्या जात व्यवस्थेने शिवाजींसारख्या राजाला जात व्यवस्थेचा बळी बनवला त्याच जात व्यवस्थेला आजचे स्वत:ला शिवरायांचे मावळे म्हणवून घेणारे बळी पडत आहेत.
मोठया कालखंडाच्या तपानंतर राजेशाही, धर्मशाही, हुकुमशाही, भांडवलशाही, अशाप्रकारच्या शाही संपुष्टात आल्या, त्याला कारणही तसेच होते, कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा ताबा त्या त्या राज्यातली, देशातली जनता घेत असते व जनशाही अर्थातच लोकशाही प्रस्थापित करीत असते. त्याला निमित्तमात्र ठरत असतात जागृतपणे समाजसेवेचं व्रत घेतलेले समाजसेवक. परंतु हे समाजसुधारक काही साधेसुधे समाजसुधारक नसतात, त्यांना झालर असते ती पुरोगामी विचारधारेची, जाणिव असते ती भोगत असलेल्या जनमाणसांतल्या दु:खद वेदनेची, त्यांच्या ज्वलंत प्रश्नांची, त्या प्रश्नांच्या यातनांची आणि म्हणुनच त्यांच्या सहनशिलतेचा अंत होऊन ती पुरोगामी विचारधारेची माणसं संघर्षाकडे वळतात. लोकांना जागृत करण्याचे काम सातत्याने करत असतात आणि म्हणूनच राज्यस्तरावर, देशपातळीवर, जागतीक घडामोडीत ती आपलं अस्तीत्व टिकवतात. परंतु दुर्दैव असं की चांगुलपणाची भुमिका मान्य नसणा-या प्रतिगाम्यांना मात्र ते सातत्यानं भीतीदायक वाटत असतं. त्यामुळे ते नेहमीच अस्थीर असतात, अस्वस्थ असतात, म्हणुन कुठल्याही मार्गाचा अवलंब करून ते आपलं अस्तीत्व शाबुत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रसंगी विविध पध्दतीने दंगलीसुध्दा घडवुन आणल्या जातात.
सध्या महाराष्ट्रात व देशभरातच अशा पध्दतीचे वातावरण निर्माण करण्याचा खटाटोप सुरू असुन सनातनी प्रवृत्तीचे लोक खुपच खालच्या स्तरावर उतरलेले आपल्याला पहायला मिळत आहेत, खरंतर छत्रपतीं राजे शिवाजींचा उदोउदो करणारे नौटंकी भक्तही त्यात मागे राहीले नाहीत, ज्यांना खरा शिवाजी राजा कळला ते मात्र चलो बुध्द की ओर म्हणत मानवतावादी ध्येयाकडे मार्गक्रमण करीत आहेत, माणुस जोडण्याचे काम करीत आहेत, परंतु ज्यांना खरा शिवाजी कळलाच नाही ते मात्र सनातनी प्रवृत्तीला बळी पडत जात व्यवस्था टिकवु पहात आहेत. ज्या जात व्यवस्थेने शिवाजींसारख्या राजाला जात व्यवस्थेचा बळी बनवला त्याच जात व्यवस्थेला आजचे स्वत:ला शिवरायांचे मावळे म्हणवुन घेणारे बळी पडत आहेत, खरेतर हे स्वत:ला शिवरायांचे मावळे म्हणुन घेणा-या मराठ्यांनी हे प्रथमत: समजुन घेतले पाहीजे. जोपर्यत या जात व्यवस्थेचे तुम्ही बळी ठरणार तोपर्यंत तुम्हाला शिवरायांचे मावळे म्हणवुन घेण्याचा काही एक अधिकार नाही. नाहीतर सर्वसमावेशक न्यायाचं राज्य कसं असावं असं राज्य निर्माण करणार्या शिवरायांच्या राज्याला अर्थातच देशाला एक कलंक आहात हे ध्यानात घ्यावं, इतिहास वाचतांना जरा प्रमाणिकपणे बारकाईने इतिहास वाचा अन् जगा. कारण शिवरायांचे मावळे हे मानवतावादी दृष्टीकोन ठेऊनच शिवरायांच्या आज्ञेप्रमाणेच चालायचे व वागायचे तथा राजांच्या सुचनेप्रमाणे राज्य कारभार करायचे. या सगळ्यांमध्ये तुम्ही कुठे दिसता का हे जरा स्वत:चे परिक्षण करून बघा, कारण, जातीचा माज आणि पैशाचा साज काहीच कामाचा नाही, शिवाजी राजा हा काही आयता वारसा हक्काने राजगादीवर बसलेला राजा नव्हता तर आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर बसलेला राजा होता हे विसरू नका, म्हणुन राजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेऊन एक टक्का तरी प्रयत्न करा. ज्या राजांचे स्वत:ला वंशज म्हणवता तो वंशज दारूच्या नशेत टर्रर पहायला मिळतो तर शिवरायांचे मावळे म्हणवुन घेणारे, जाती धर्माच्या सावटाखाली व दहशतीखाली वावरतांना दिसत आहेत, व दहशतही माजवत आहे, खरं तर सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे, शिवरायांचा काळ सरंजामशाहीचा होता. नंतरच्या काळात जगाने व देशाने राजेशाही व्रज्य ठरवत राजे राजेवाडे नाहीसे व्हावेत म्हणुन संघर्ष केले, राजेशाही मोडल्यानंतर कालांतराने त्याजागी अथक परिश्रमाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जगाचा अभ्यास करून देशाला हीतकारक अशी लोकशाही दिली, हे एकादृष्टीने खुपच चांगले झाले. प्रगत अशा भांडवलशाहीसमोर व साम्राज्यशाहीसमोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही, यावरूनच सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ समाजव्यवस्था ठरते हे सिध्द झाले आहे, तरीही या आधुनिक लोकशाहीच्या राज्यात, देशात आजही राजे शिवाजींचा उदोउदो का होतो याचा आपण विचार केल पाहीजे, नव्हे आता भानावर आलं पाहीजे, कारण राजे अनेक होऊन गेले, परंतु आजही या राजाची आम्हाला आठवण का यावी, या राजाची जयंती, मोठ्या दिमाखात का साजरी होते, या राजामध्ये असे काय वेगळेपण होतं की ज्यामुळे हे सारं घडत आहे, हे आपण कधीच का समजुन घेतले नाही. नुसताच शिवाजी आमुचा राजा एवढ्च म्हणायचं आणि कृतीत मात्र वेगळं दाखवायचं, हा विरोधाभास का? याचा जर प्रमाणिकपणे सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते, ती ही की, शिवरायांचं राज्य लोकांना आपलं राज्य वाटायचं, तो राजा आपला राजा वाटायचा, राजाच्या राज्यात जनता अत्यंत सुरक्षित होती. परंतु आज देशात घडत असलेल्या असहीष्णुतेच्या वातावरणातुन असे दिसुन येते की, कदाचित तुम्हाला शिवरायांच्या न्यायाचं राज्य मान्य नव्हतं तर आणि म्हणूनच जात व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं काम राज्यात व देशात मोठ्याप्रमाणात सुरू आहे. लोकांपासून निर्माण झालेलं लोकशाही राज्य लोकांकांपासुनच वेगळे पडत चाललेलं आहे असे दिसत आहे.
परंतु आता लक्षात घ्या, या जाती व्यवस्था मानवाचे कधीही कल्याण करू शकणार नाहीत, उलट यातुन वैरच उफाळुन येईल.
विकास साळवे
9822559924