लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्केट नामकरण करावे 

0
छावा संघटनेने बोर्डाकडे केली मागणी
खडकी : खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने रेंजहिल्स येथे मार्केट उभारण्यात आले आहे. या मार्केटला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असे नामांतर करण्यात आले असुन मार्केट प्रवेशद्वारा जवळ कमान उभारण्यात आली आहे. मात्र ही कमान अद्याप कोरीच असल्याने कँन्टोन्मेंट प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे प्रदर्शन झाले आहे. नामांतर प्रकरणी छावा संघटनेने नुकतीच सी.ई.ओ.अमोल जगताप यांच्याकडे मागणी केली आहे. बोर्डाच्यावतीने साधारणपणे 1984 मध्ये वाँर्ड क्रमांक 5 रेंजहिल्स इंग्रजी माध्यम शाळे जवळ मार्कट उभारण्यात आले. या मार्केट मधील 40 गाळे भाडेकरार पध्दतीने वाटप करण्यात आले. या मार्केटचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असे नामांतर करण्यात आले आहे. या करिता नामांतर कमानही उभारण्यात आली. मात्र मागील अनेक वर्षांपासुन ही कमान नामांतरविना कोरीच आहे.
अंमलबजावणी करण्याचे दिले आश्‍वासन
या प्रकरणी छावा संघटनेने प्रशासनाचे लक्ष्य वेधले आहे. संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनायक चिवे, दिपक वणवे, निखिल बागुल, विजय पवार, विकी परदेशी, विशाल सोनवणे, सुरेश सुलाखे, मुन्ना शेख, अशोक शिरसाठ आदी कार्यकर्त्यांच्या शिष्ठ मंडळाने नुकतेच सी.ई.ओ.अमोल जगताप यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. हे निवेदन बोर्डाचे उपाध्यक्ष कमलेश चासकर यांनाही देण्यात आले. रेंजहील्स मार्केट येथिल लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाम फलक प्रकरणी तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्‍वासन सी.ई.ओ.जगताप व उपाध्यक्ष चासकर यांनी यावेळी संघटनेस दिले.