ऐरोली : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऐरोली आणि दिघा विभाग कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिघा प्रभाग समिती अध्यक्षा दीपा गवतें व ऐरोली प्रभाग समिती अध्यक्ष संजू वाडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांनी लोकल्याणासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. या संदर्भात ऐरोली प्रभाग समिती अध्यक्ष संजू वाडे यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विखुरलेल्या दलित समाजाला एकत्र आणण्याचे, संघटित होण्याचे ,तसेच तळागाळातील नागरिकांसाठी व कामगारांसाठी कशारितीने संघर्ष केला, आपल्या शाहिरी कलेतून लोककलेची जनजागृती केली, अशा थोर विचारवंतांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम हा प्रथमच ऐरोली विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.