लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा

0

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राबविला उपक्रम

चिंचवड- पृथ्वी ही शेषनागावर उभी आहे असे म्हणले जायचे. परंतु आण्णा भाऊ साठे यांनी पृथ्वी ही क ष्टकरी, मजुरांच्या तळहातावर तरली आहे सां गितले. आण्णा भाऊंची शाहीरी संयुक्त महाराष्ट ्रासाठी सतत प्रेरणा देत राहिली. त्यामुळे 107 लोकांनी प्राणांची आहुती दिली. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शाहिरी आहे, असे मत राष्ट ्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अ‍ॅड. जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामा जिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अ‍ॅड. गायकवाड बोलत होते. चिंचवडमधील आ ॅटोक्लस्टर येथे ही अभिवादन सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, राजू बनसोडे, नगरसेविक ा सुलक्षणा शिलवंत, प्रज्ञा खानोलकर, गोरक्ष लोखंडे, अरूण बोर्‍हाडे, निलेश पांढारकर, पंडीत कांबळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, कविता खराडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, दिपक साकोरे, शिला भोंडवे, शशिकांत निकाळजे, प्रशांत कडलग, संदिपान झोंबाडे, यतिन पारेख प्रमोद साळवी, रामदास मोरे, साऊल शेख, श शिकांत घुले आदी उपस्थित होते.

अण्णा भाऊंची शाहिरी प्रेरणादायी
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, दिड दिवसाची शाळा शिकुन आण्णा भाऊंनी प्रेरणादायी साहित्य लिहले. आण्णा भाऊंचा जयंतीदिन हा मराठीदिन म्हणून साजरा करण्यात आला पाहिजे. आण्णा भाऊंचे साहित्य, प्रेरणादायी तसेच संयुक्त महाराष्ट ्रासाठी गायलेली शाहिरी आजही तितकीच प्रेरणादायी आहे. सामाजिक सलोखा प्रस्थापित क रणारी त्यांची शाहिरी सतत ऐकावी असेच वाटते. आण्णा भाऊ साठे यांचे विचार आता तळागाळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी नव्या पिढी समोर मांडणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी- चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विनोद कांबळे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचा आढावा सादर केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन सकाटे, अभिजीत भालेराव, संजय तुपे, सुर्यकांत पात्रे, शिवदास चिलवंत, समाधान मारकड, आकाश अंकुटे, योगेश आयवळे, गणेश शिंदे, अभिजीत गोपी, अभिजीत आल्हाट, शिवाजी सुरवसे, राजेंद्र शिंदे, हनुमंत प्रधान, धर्मा शिंदे, केरबा पात्रे, मारूती पात्रे, अ मित गायकवाड, प्रविण बनसोडे, ऋषीकेश सोनवणे, बुध्दकोष निकाळजे, राम तुपे आदींनी प्रयत्न केले.