ठाणे । लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या 7 व्या स्मृती दिनानिमित्त मृदुगंध पुरस्काराचे वितरण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, शास्त्रीय नृत्य विशारद मंजिरी देव, ढोलकी सम्राट राजाराम जामसंडेकर, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जयंत पवार आणि अभिनेते सुबोध भावे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
डफावरील सन्मानचिन्ह मान्यवरांना प्रदान
या सन्मान सोहळ्यात विठ्ठल उमप यांचा जांभूळ आख्यानमधील स्मृती जगविणारी प्रतिकृती आणि शाहिरीचे प्रतीक असणार्या डफावर सन्मान चिन्ह देण्यात आले. या वेळी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या समवेत सिद्धिविनायक न्यासचे आदेश बांदेकर उपस्थित होते. त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने पुरस्कार सुरू करण्यासाठी आणि केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार उमप यांनी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात अभिनेते सुबोध भावे यांनीदेखील जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर या पुरस्काराची सुरुवात शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय संगीताने झाली.
ठाणेकरांनी केली गर्दी
या समारोहाच्या निमित्ताने पंडित शोनक अभिषेकी यांनी शास्त्रीय संगीत, शकुंतला नगरकर यांनी संगीत बारी, इफोनी ऑफिशियल फ्युजन बँड फिर बी दिल हिंदुस्थानी फेमदेखील सादर करण्यात आला. या वेळी ठाणेकर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या सन्मान सोहळ्यात विठ्ठल उमप यांचा जांभूळ आख्यानमधील स्मृती जगविणारी प्रतिकृती आणि शाहिरीचे प्रतीक असणार्या डफावर सन्मानचिन्ह देण्यात आले.
जुन्या आठवणींना उजाळा
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सरकारच्या वतीने पुरस्कार सुरू करण्यासाठी आणि केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार उमप यांनी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अभिनेते सुबोध भावे यांनीदेखील जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर या पुरस्काराची सुरुवात शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय संगीताने झाली.