लोकशाहीला बळकट करण्यासाठी दिव्यांगांनी मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक

0

दिव्यांग मतदारांचा सन्मान

जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त संत गाडगे महाराज अर्थसहाय्य योजनेचा प्रारंभ

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शहरातील दिव्यांग मतदार व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. निवडणूक आयोगातर्फे छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोमवारी (दि. 3) जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन अशा मतदारांचा सत्कार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार, चिंचवड विधानसभा मतदार संघांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रम घेण्यात आला.

मतदानाचा हक्क बजवावा…

सुरूवातीला दिव्यांग मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले. आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी दिव्यांग मतदारांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले. लोकशाहीला बळकट करण्यासाठी दिव्यांगांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविणे अपेक्षीत आहे, असे मतदार नोंदणी अधिकारी राधिका हावळ आणि नायब तहसिलदार उषा ठोंबरे यांनी सांगितले.

दिव्यांगासाठी अर्थसहाय्य योजनेचा शुभारंभ…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य म्हणून संत गाडगे महाराज ही दिव्यांग कल्याणकारी योजनेचा शुभारंभ झाला. जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती…

याप्रसंगी, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण सभापती स्वीनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शहर सुधारणा समिती अध्यक्ष सिमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्ष अनुराधा गोरखे, नगरसेवक नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या.