जळगाव : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजीत करण्यात येतो. परंतु सोमवार दिनांक 1 ऑक्टोबर 2018 रोजी जिल्हा नियोजन विकास समिती ( DPDC ) यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याने सदरचा लोकशाही दिन हा सोमवार दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन होणार आहे. ज्या नागरीकांच्या तक्रारी असतील त्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात स्वत: उपस्थित राहून मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.