धुळे । आज भारताची लोकसंख्या 135 कोटीच्या पुढे गेली आहे. हे असेच चालू राहिल्यास उद्या जगणे कठिण होईल. खाण्यासाठी अन्न मिळणार नाही. फिरताही येणार नाही. या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ सर्वांसाठी समान स्तरावर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार टी.राजसिंह यांनी केले.
लव्ह जिहाद एक षडयंत्र
हिंदु जनजागृती समितीच्या वतीन आयोजित धर्मसभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जैन, मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मराठी आणि हिंदूंच्या अन्य जातीतील मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राद्वारे पळवून नेले जात आहे. या फसवलेल्या मुलीचे नंतर धर्मांतर करून त्यांची संपत्ती हस्तगत करणे आणि त्यांना मुल जन्माला घालणारे यंत्र (मशीन) समजून स्वतःच्या पंथाची लोकसंख्या वाढवण्याचे षड्यंत्रच जिहादी आणि आतंकवाद यांनी रचलेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नंदकुमार जाधव, सुनील घनवट, क्षिप्रा जुवेकर आदींची यावेळी भाषणे झाली.