धुळे । धुळेकर नागरिकांचे भावनिक नाते असलेल्या पांझरा चौफुलीच्या जागेवर होणार्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून पांझरा चौपाटीवरून सिमेंट बाक तोडणारे, भींत व गटार तोडणार्या, संरक्षक जाळी व अँगल चोरणारे, दारू पिणारे व विकृत चाळे करणारे, फिरायला येणार्या मुली व गृहिणींची छेळ काढणारे यांचेविरूद्ध लोकसंग्राम संघटनेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नागरिकांचे हक्काचे व विरंगुळ्याचे ठिकाण
धुळे शहरात अनिल गोटे यांनी साकारलेल्या शिवतीर्थ येथील पांझरा चौपाटीच्या जागेत शहरातील नागरिक नियमित जात असतात. पांझरा चौपाटीची निर्मिती झाल्यापासून राष्ट्रवादी सेनेने चौपाटी उद्ध्वस्त करेपर्यंत तेथे पांझरा चौपाटी स्टॉलधारक, शहराचे सूज्ञ व जागरूक नागरिक, लोकसंग्राम कार्यकर्ते, पोलिस प्रशासन हे नेहमी लक्ष ठेवून असायचे. त्यामुळे सुरक्षीततेचे वातावरण होते. पण आता सदर जागी नुकसान व विकृत चाळे करण्यास सुरूवात झालेली आहे. याविरूद्ध लोकसंग्राम संघटतनेतर्फे तेजस गोटे व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर गोष्टींचा अटकाव करण्यासंबंधी योग्य ते आदेश पारित करावे, ही विनंती केली.