घरातून 15 लाख रोख, सोन्याचे दागिने लंपास
धुळे – महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोचली असताना एका उमेदवाराच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करीत 15 लाख रुपये रोख व सात ते आठ तोळे सोने घेऊन पसार झाले आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हा प्रकार समोर आला आहे उमेदवार प्रचारात दंग असतांना चोरट्याने काम दाखवले आहे. ही घटना समोर आल्याने धुळे शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीत राजेंद्र माधवराव केकान हे लोकसंग्राम पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.
ग.स. कॉलनी, हिरे मंगल कार्यालय जवळ त्यांचे घर आहेत प्रचाराच्या अंतिम दिवशी ते प्रचारात दिवसभर दंग होते. याचा फायदा घेत पोलिसांनी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व त्यांनी कपाटातील 15 लाख रुपये रोख आणि ७ – ८ तोळे सोने असा ऐवज लांबवला आहे. उमेदवार राजेंद्र केकान यांनी शेती विकून 15 लाख रुपये आपल्या घरी ठेवले होते. रात्री उशिरा व त्यांनी चोरी केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर धुळे शहरात एकच चर्चा रंगली आहे धुळे महापालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर असताना धुळ्यात विविध प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे संवेदनशील धुळ्यात निवडणूक भयमुक्त व्हावी यासाठी प्रशासन व पोलीस विभाग योग्य कारवाई करावी, अशी मागणी धुळेकर करीत आहेत.