भुसावळ- मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनंतरही मागण्यांची पूर्तता न झाल्याने, लोकसंघर्ष मोर्चाच्या सचिव प्रतिभा शिंदे पदाधिकार्यांसह शहादा तालुक्यातील टाकरखेडा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी त्यांची अडवणूक करत कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याने या घटनेचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन दिले.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर लोकसंघर्ष मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक काठे, ईश्वर जोहरी, भरत जोहरी, दावू ठाकूर, प्रदीप जोहरी, सिमा चौधरी, सुनिता मेंढे, सविता पाटील, सविता ठाकूर, वैशाली ठाकूर, कमलबाई शेळके, योगिता पाटील, आरती जोहरी, लता जोहरी, धर्मेंद्र जोहरी, श्रीराम पाटील, मोहन पाटील आदिंच्या स्वाक्षर्या आहेत. प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत लोकसंघर्ष मोर्चातर्फे आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असे पदाधिकार्यांनी निवेदनात नमूद केले आहे.