इंदौर – लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये त्या एका स्कुटीच्या मागच्या सीटवर विना हेल्मेट प्रवास करताना दिसत आहेत. सामान्य जनतेला वाहतुकीचे धडे सांगणारे नेतेच नियमांचे पालन करत नाही, असे या व्हिडिओ वरुन समजते. विशेष म्हणजे त्यांनी तोडलेल्या नियमांमुळे त्यांच्यावर अद्याप कोणती कारवाई झालेली नाही.
इंदौरमध्ये अहिल्या उत्सव सुरू आहे. तेथील महिलांनी पालखी यात्रेचे आयोजन केले होते. पालखी यात्रेमध्ये सुमित्रा महाजन यांनी सुद्धा हजेरी लावली होती. मात्र, त्या पालखी यात्रेचा मार्ग लांब-लचक असल्याने सुमित्राजींसाठी स्कुटीची व्यवस्था करण्यात आली. त्या स्कुटीवर त्या चक्क विना हेल्मेट बसलेल्या व्हिडिओत दिसत आहेत.
ती स्कुटी इंदौर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शंकर लालवानी चालवत होते. त्यांच्या मागे सुमित्राजी बसलेल्या होत्या. दरम्यान, चालकानेही हेल्मेट घातलेला नव्हता आणि सुमित्राजींनीही तो लावला नाही. त्यांना शेवटपर्यंत भानच नव्हते की आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहोत.
लोकसभेचे नेतृत्व करणाऱ्या सुमित्राजींना वाटले असावे, की आपण सर्वोच्च पदावर आहोत तर आपल्याला कोणी काही म्हणणार नाही. मात्र, त्या विसरल्यात की त्या एका जबाबदार पदावर आहेत, अशी प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक देत आहेत.