लोकसभा ठप्पच!

0

नवी दिल्ली : विविध विषयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सलग पाचव्या दिवशी लोकसभेत शून्य प्रहर घेता आला नाही. तसेच दिवसभरासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. शुक्रवारी शून्य प्रहर सुरु होताच तेलंगणा राष्ट्रसमिती सदस्य आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी घोषणा दिल्या आणि गदारोळ केला. ज्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.