नवी दिल्ली : रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना तोंडघशी पाडण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या तीन-चार महिन्यात दोन लाख पदांची भरती करण्यास केंद्राने हिरवा कंदिल दाखवला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने मेगा भरतीसाठी प्रत्यन सुरु केल्याने कॉंग्रेसमध्ये चिंतेच वातावरण तयार झाले आहे.
रोजगाराच्या मुद्द्यावरून चीनशी भारताची तुलना करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर सतत टीका केली होती. होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रोजगाराच्या मुद्द्यावरच भर देण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. शिवाय काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातही हा मुद्दा घेण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेसच्या या मुद्द्यातील हवा काढून घेण्यासाठीच दोन लाख पदांची भरती करण्यास मंजुरी दिल्याचं सूत्रांच्या वतीन सांगण्यात आल आहे.
रेल्वेमध्ये ९० हजार पदांची भरती
रेल्वेत ९० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ६४, ३७१ विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील ५,८८,६०५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची शनिवारी यादी जारी करण्यात आली आहे. हे विद्यार्थी आता १२ ते १४ डिसेंबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यासाठी परीक्षा देणार आहेत.
पॅरामिलिट्रीत ५४ पदांची भरती
पॅरामिलिट्रीत ५४ हजार पदांची भरती करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात आढावा घेतला होता. ही भरती करण्यासाठी लवकरच एक सूत्र तयार करण्यात येणार आहे. नोकरभरतीबाबतचे नोटीफिकेशन्स याच महिन्यात जारी करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक २१ हजार पदे सीआरपीएफमध्ये रिक्त असून बीएसएफमध्ये १६ हजार पदे रिक्त आहेत.
एसएससीमध्ये ४० हजार पदांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशननेही मार्च पूर्वीच ४० हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. सी आणि डी वर्गातील हे पदे आहेत. मात्र नोकरभरती घोटाळ्याचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे लक्ष लागले आहे.