लोकसभा निवडणुकीसाठी बुथप्रमुख महत्वाचा दुवा -माजीमंत्री एकनाथराव खडसे

0

मुक्ताईनगर- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 350 प्लस जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हाथ बळकट करण्यासाठी बुथप्रमुख महत्वाचा दुवा असल्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हा परीषद गट निहाय बुथ प्रमुख व बुथ समिती सदस्यांची बैठक बुधवारी सकाळी 11 वाजता कुर्‍हा-वढोदा जिल्हा परीषद गटात तर दुपारी तीन वाजता निमखेड पंचायत समिती गणात करण्यात आले होते. शासकीय योजनांचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी बुथप्रमुख महत्वाचा दुवा असल्याचे मत खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, जिल्हा परीषद सदस्य वनिता गवळे, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, पंचायत समिती सदस्य विद्या विनोद पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, सरचिटणीस डॉ.बी.सी.महाजन व मान्यवर उपस्थित होते.