लोकसभा निवडणूकीसाठीचे पहिले मतदान झाले !

0

इटानगर: २०१९ ची लोकसभा निवडणूक चार टप्प्यात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान आज ६ एप्रिल रोजी पहिले मतदान अरुणाचलमध्ये पार पडले. मात्र, हे मतदान सर्वसामान्य जनतेसाठी नव्हते तर इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलिसांसाठी होते. या जवानांनी आज पोस्टल बॅलटच्या माध्यमांतून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. अरुणाचल प्रदेशच्या लोहितपूर येथे ही मतदान प्रक्रिया पार पडली.