लोकसभा निवडणूकीसाठी शेवटच्या दिवशी २७ उमेदवारांचे ३९ अर्ज

0

जळगावसाठी १५ उमेदवारांचे २२ अर्ज तर रावेरसाठी १२ उमेदवारांचे १७ अर्ज

जळगाव:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १५ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी १२ उमेदवारांनी १७ अर्ज दाखल केले आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीकडून ईश्वर मोरे यांनी ३ अर्ज, सुभाष खैरनार, रूपेश संचेती, अनंत महाजन, गनीशाह इस्हाक शाह, संत बाबा महाहंस महाराज पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज तर ओंकार जाधव यांनी २ अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले आहेत. इंडियन युनियन मुस्लीम लीगकडून रऊफ युसुफ शेख यांनी २ अर्ज, वंचित बहुजन आघाडीकडून अंजली बाविस्कर यांनी २ अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून राहुल बनसोडे, भारतीय जनता पार्टीकडून आ. उन्मेश पाटील यांनी २ अर्ज तर संपदा पाटील यांनी १ अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय जनशक्ती पार्टीकडून (सेक्युलर) शरद भामरे, महाराष्ट्र क्रांती सेनाकडून वंदना पाटील, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाकडून प्रदिप मोतीराया तसेच हिंदूस्थान निर्माण दलकडून संत श्री बाबा महाहंस महाराज पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून इम्रान रऊफ खान व रोशन आरा सादीक अली. अली यांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला आहे. तर इम्रान रऊफ खान, तंवर विजय जगन, सुनिल पंडित पाटील, रविंद्र दंगल पवार यांनी प्रत्येकी १ तर डी.डी. वाणी (फोटोग्राफर) यांनी अपक्ष म्हणून ४ अर्ज दाखल केले आहे. त्याचबरोबर आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाकडून रोहीदास अडकमोल, वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडेलकर यांनी २ अर्ज, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीकडून अजित तडवी, बहुजन समाज पार्टीकडून योगेंद्र कोलते, हिंदूस्थान जनता पार्टीकडून मधुकर पाटील तर बहुजन मुक्ती पार्टीकडून गौरव सुरवाडे यांनी प्रत्येकी एक अर्ज अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे दाखल केले आहेत.