लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निर्धारित वेळेच्या आधी घेतल्यास निवडणूक आयोग त्याचवेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यास सक्षम असल्याचं केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत म्हणाले डिसेंबरमध्ये चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह लोकसभेची निवडणूक घेण्यास आम्ही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. जर डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडल्या तर राजस्थान छत्तिसगढ, मध्यप्रदेश, आणि मिझोरमच्या आगामी विधानसभा निवडणूकांना एकत्र घेण्यावर निवडणूकची शक्यता असलयाचे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वन नेशन वन इलेक्शन’वरुन देशभरात चर्चा सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी अत्यंत महत्वपूर्ण विधान केलं आहे. येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक घेण्यास आम्ही सक्षम आहोत असं ते म्हणाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे एक दिवसापूर्वीच रावत यांनी देशातील विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता फेटाळली होती.

लोकसभेच्या निवडणुका मुदतीपूर्व संपन्न केल्या तर चारही राज्यांच्या विधानसभा निवडणूक एकत्र संपन्न करता येतील का ? या प्रश्नाचं उत्तर देताना ओ. पी. रावत यांनी बुधवारी म्हटले की, ‘चार राज्यांच्या निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेण्यास आयोगाची पूर्ण तयारी आहे. सप्टेंबर अखेरीपर्यंत ईव्हीएम मशिन उपलब्ध होतील. १६ लाख व्हीव्हीपॅट मशिन नोव्हेंबरपूर्वी उपलब्ध होतील, तर उर्वरीत दीड लाख व्हीव्हीपॅट मशिन नोव्हेंबरअखेरपर्यंत हाती येतील. ३० सप्टेंबरपर्यंत १३ लाख ९५ हजार मतदान मशिन उपलब्ध होतील. त्यामुळे डिसेंबरमध्ये कोणतीही अडचण होणार नाही’.