दिल्ली : कोरोना संसर्गाची गती पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहेत. ते एम्समध्ये दाखल आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. एम्सने प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तानुसार, बिर्ला यांनी १९ मार्च रोजी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली होती आणि दुसर्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्याचे सगळे रिपोर्ट सामान्य आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.