लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक अधिकार: संजय राऊत

0

नवी दिल्लीः भाजपानंतर एनडीएमध्ये सर्वाधिक खासदार आमचे आहेत. त्यामुळे लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक अधिकार आहे असे म्हटले आहे. ते लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी लोकसभा उपाध्यक्षासंदर्भात त्यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी ही उपाध्यक्ष पदावर आमचा नैसर्गिक अधिकार असल्याचे म्हटले आहे.

अयोध्येत राम मंदिर पुनर्निर्माणाची योग्य वेळ आली आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. आता मंदिराच्या निर्माणात उशीर व्हायला नको. राम मंदिराचं पुनर्निर्माण लवकरच होणार आहे. पुन्हा राम मंदिराच्या नावाने जनतेकडे मते नाही मागता येणार. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून रोजी सर्व खासदारांबरोबर अयोध्येत रामलल्लाचे दर्शन करणार आहेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीही संजय राऊतांनी यावर भाष्य केले आहे. भाजपाकडे 303 खासदार आहेत, शिवसेनेकडे 18 खासदार आहेत. तर एनडीएकडे 350हून अधिक संख्याबळ आहे. त्यामुळे राम मंदिर पुनर्निर्माणासाठी आणखी काय हवे आहे, तरीही यंदाच्या निवडणुकीत राम मंदिर पूर्णत्वास गेलं नाही आणि तिसरी निवडणूक या मुद्द्यावरून लढावयास लागली तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नसल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा दावा आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.