नवी दिल्ली-बहुचर्चित राफेल घोटाळ्याबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा भाजप सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. पंतप्रधानांच्या शिफारशीमुळेच अनिल अंबानी यांना हा कंत्राट मिळाल्याचे आरोप राहुल गांधी यांनी केले आहे. लोकसभेत आज राहुल गांधी यांनी राफेलवरून भाषण केले, त्यावेळी त्यांनी मोदींवर निशाना साधला.
हवाई दलाला १२६ विमानांची गरज असताना आपण फक्त ३६ राफेल विमाने का घेत आहोत ?, माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना नव्या कराराबाबत माहिती नव्हती, हवाई दलाच्या मागणीमध्ये कोणी बदल केला ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.