भारीप बहुजन महासंघाची प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी
भुसावळ- आगामी लोकसभेसह विधानसभेची निवडणूक ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी, अशी मागणी भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकार्यांनी सोमवारी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. महाराष्ट्रभरात ईव्हीएम हटावा, देश बचावो राज्यस्तरीय घंटानाद आंदोलनाद्वारे निवेदन देण्यात आले.
ईव्हीएमवरील विश्वास उडाला
भारीपाच्या निवेदनानुसार भारत हा लोकशाहीप्रणीत देश असून संविधानामुळे लोकशाही समृद्ध व सर्वश्रेष्ठ ठरली असून देश-विदेश स्तरावर ईव्हीएममध्ये दोष आढळून आल्याने या प्रणालीवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदन देताना भारीपा जिल्हाध्यक्ष विनोद अशोक सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महासचिव दिनेश इखारे, तालुकाध्यक्ष रूपेश इखारे, वंदना सोनवणे, गणेश इंगळे, बबन कांबळे, तुषार जाधव, विद्यासागर खरात, प्रल्हाद घारू, सुनील ठाकूर, निलेश जाधव, सुदाम सोनवणे, संजय सुरडकर, राकेश बाविस्कर यांच्या स्वाक्षर्या आहेत.