वाढदिवसानिमित्त आलेल्या कार्यकर्त्यांचा सुर
चाळीसगाव – मुंबई येथील महानंद डेअरीचे माजी संचालक आणि जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांचा वाढदिवस नुकताच चाळीसगाव येथे उत्साहात पार पडला. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील यशस्वी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आशिष लॉन्स येथे प्रमोद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी आयोजित केलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्याला माजी आमदार राजीव देशमुख, दिनेश पाटील व माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील, डॉ. कर्तारसिंग परदेशी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत, विकासो सदस्य यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
प्रमोद पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याने कार्यकर्त्यांकडून सुर निघत होता. चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यातील तरुणांचे संघटन मजबूत करण्यात प्रमोद पाटील आघाडीवर राहिले, त्यामुळेच त्यांना कै. लोकनेते अनिलदादा देशमुख यांनी वीस व बावीस वर्षापूर्वी बेलगंगा साखर कारखान्याचे संचालक पदावर काम करण्याची संधी दिली होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल की नाही
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
यावेळी माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील, ईश्वरसिंग ठाकरे, अतुल देशमुख, भूषण पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, किशोर पाटील, महिला तालुकाध्यक्ष सोनल साळुंखे, अभय सोनवणे, अजय भाऊसाहेब पाटील, शिवाजी आमले यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी प्रास्ताविकात प्रमोद पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. युवा उद्योजक मंगेश चव्हाण, न.पा.भाजपा गटनेते संजय पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामीण व शहर परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आभार प्रभाकर पारवे यांनी मानले.