लोकसहभागातून करजई ग्रामस्थांनी नदी प्रवाह वळविला

0

शहादा। तालुक्यातील करजई येथील ग्रामस्थांनी पाणी अडवा पाणी जिरवा हा संकल्प करत पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे या हेतूने प्रेरित होउन नदीचा प्रवाह वळवून तो गावाकडील काठावरुन साधारण दोन किमीच्या पट्टा प्रवाहीत केला आहे. 25 फुट रुंद करुन पुर्वी सुरु असलेली गोमाइ नदी जी लांबोळा कडुन प्रकाशाकडे जाते तिला करजइ गावातील ग्रामस्थानी दिशा बदलली आहे. पहिला प्रवाह असलेली जागा ही पूर्णतः कडक झाली होती. नदीचा प्रवाह बदल्यामुळे पाण्याचा निचरा होणार आहे. कुपनलिका व विहीर यांची पाणीपातळी वाढणार आहे. या कामात महेंद्र पाटील रा. पिंगाणे व संदीप पाटील रा. मलोणी यांचे सहकार्य लाभले. गेल्या तीन दिवसांपासुन हे कार्य सातत्याने सुरु आहे.

दोन दिवस चालणार काम
प्रथम जेसीबीचा साहाय्याने नदीचे रुंदीकारण केले नंतर पोकलँडचा वापर करण्यात येतो आहे. हे कार्य दोन दिवस चालण्याची शक्याता आहे. मोहन पाटील ग्रामस्थ करजइ यांचा म्हणण्यानुसार कामाची दखल घेवून जि.प. सदस्य अभिजित दादा यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. शासनाकडुन कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ग्रामस्थांनी केलेल्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.