निजामपुर। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील खुड़ाणेगावा जवळ असलेले घटबारी धरणाचे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर 2016 रोजी पावसामुळे धरणाच्या फुटले होते. याकामाची सुरुवात गुरूवारी साक्रीचे तहसीलदार संदीप भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या धरणाचे काम लोकसहभागातुन करण्याचा निर्णय खुडाणे गावकर्यांनी घेतले होते. ते काम 90% पुर्ण झाले असुन लोकसहभागातुन काम हे महाराष्ट्र नव्हे देशात पहिली घटना आहे. यामुळे परिसरात कौतुक होत आहे.
सरपंचांचा पाठपुरावा
या धरणाच्या दुरुस्तीसाठी 56 लाख रुपयांची आवश्यकता होती. हा निधी शासनाकड़ून मिळावा यासाठी सरपंच प्रतिनिधी पराग माळी व ग्रामस्थानी शेतकर्यांनी लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यास यश आले नाही. यामंजुरीसाठी पैसा नाही कामाला वेळ लागणार होता. पंरतु पावसाळा आधी काम झाले म्हणजे पाणी मिळेल यासाठी सरपंच कल्पना माळी यांनी आथिर्क मदत गावातुन गोळा करण्यात यावे असे ठरले.