आळंदी : येथील इंद्रायणी नदीवर भाविकांसाठीची नळजोड लोकसहभागातून दुरुस्त करून वापरास योग्य करण्यात आली. नदी घाटावर तुटलेल्या नळजोडमूळे भाविकांत नाराजी होती. येथील नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश रहाणे यांनी आपल्या स्वखर्चातून तीन नळजोड बसवून पूर्वीचे नळजोड मजबूत दुरुस्तीचे काम करून कोंडाळीची दुरुस्ती केली. दुरुस्त झालेले नळ नागरिकांना वापरास सुरु झाल्याचे मल्हार काळे यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते गणेश रहाणे यांचे अभिनंदन करण्यात आले.हातगाडी पथारी व्यावसायिक संघाचे प्रमुख मल्हार काळे,गणेश रहाणे व साहेबराव पांढरे आदी उपस्थित होते.