लोकसहभागातून बांधकाम केलेल्या खुडाणे घटबारी धरणाचे जलपुजन

0

निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील खुडाणे डोमकणी परिसरातील घटबारी धरण मागच्या पावसाळ्यात फुटले होते. या धरणामुळे खुडाणे परिसरात 8 ते 10 गावांचा पाणी प्रश्न निर्माण झाला होता. धरणाचे बांधकामासाठी सुमारे 56 लाखाचे बँजेट होते. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करुनही गावकर्‍यांना यश आले नाही. सरकारी काम बारा महिने थांब अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पंरतु पावसाळ्याआधी बांधकाम करणे आवश्यक होते. यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ता पराग राजेंद्र गवळे यांनी आई कल्पना राजेंद्र गवळे सरपंच असल्याने याची व गावकर्‍यांची मदत घेवून ग्राम सभेचा आयोजन करण्यात आले. धरणाचे बांधकामासाठी वेळ लागणार आहे. तरी जनतेने लोकसहभागातून व लोक वर्णनीतुन काम करण्याचे ठरवले.

आमदारांनी केले गावकर्‍यांचे कौतुक
यावेळी घटबारी धरणाची पाहणी केली. आ. अहिरे यांनी गावकर्‍यांचे कौतुक करुन शासनाची कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत ना घेता लोकसहभागातून धरणाचे काम पूर्ण केले. गावकर्‍यांनी महाराष्ट्रात नव्हे देशात आदर्श निर्माण केला आहे. या लोकसहभागातील कामांची कल्पना मुख्यमंत्री ना देणार असल्याचे आ. अहिरे यांनी सांगितले.तसेच सरपंच प्रतिनिधी पराग गवळे यांनी धरणाचे बांधकामाचे श्रेय गावातील लोकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना दिले आहे.

केला आदर्श निर्माण
ग्रामपंचायत खुडाणे, घटबारी जलसधारण समिती, ट्रक्टर युनियन, अनुलोम समिती, महात्मा फुले कुषी प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या विशेष सहकार्य झाले आहे. आ. अहिरे यांनी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या धरणाचे कौतुक करतांना सांगितले की, खुडाणे, घटबारी येथील नागरिकांनी राबविलेल्या लोकसहभागातील धरण बांधण्याच्या कामांने महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.

90 टक्के जलसाठा जमा
या धरणात पाण्याचा 90% जलसाठा जमा झाला असुन साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे , तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी आमदार अहिरे व प्रशासनाने खुडाणे गावकर्‍यांचे कौतुक केले यावेळी निजामपुरचे सपोनि दिलीप खेडकर, वन अधिकारी एस के सिसकर, चिते तलाठी रोझेकर, महेश पाटील, महात्मा फुले कुषी प्रतिष्ठानचे रविंद्र खैरनार, अनुलोकचे कल्पेश पाडवी, श्नावण चौहान, खुडाणेचे सरपंच कल्पना गवळे, सदस्य कन्हैयाल काळे, पराग गवळे, पांडुरंग माळी व गावकरी उपस्थितीत होते.