लोकांच्या आवडी-निवडी बदलल्या पाहिजे – मराठी सिनेअभिनेता संतोष जुवेकर

0

मू.जे.महाविद्यालयातील इव्हेंट विभागातर्फे गॉट टॅलेंट 2017 स्पर्धा

जळगाव। सध्या सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे त्याला चित्रपटसृष्टी देखील अपवाद नाही. या स्पर्धेत जगात टीआरपी वाढविण्यासाठी भंपकबाजी व चकमकीत असे काहीही दाखविण्यात येते. आज अनेक मालिका अशा आहेत ज्यात काहीही वास्तव व सत्यता नसते. केवळ त्यांच्या भंपकबाजीला बळी पडून प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात. तसेच प्रत्यक्ष जीवनात त्याचे अंधानुकरणही करतात, परंतू लोकांनी आपल्या आवडी-निवडीत बदल करायला हवे असे आवाहन मराठी सिनेअभिनेता संतोष जुवेकर यांनी केले. मू.जे.महाविद्यालयातील इव्हेंट विभागात आयोजित गॉट टॅलेंट 2017 स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. या कार्यक्रमासाठी जुवेकर उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. यावेळी केसीई सोसायटीचे संचालक चंद्रकांत भंडारी, प्रा.गोखले, प्रा.इंद्रजित चौधरी आदी उपस्थित होते.

अवास्तवतेला धुडकावून लावा
टिव्ही हे माध्यम घराघरात पोहोचलेले असल्याने छोट्या पडद्याला मोठ्या पडद्याचे स्वरुप आले आहे. छोट्या पडद्यावर आज असंख्य मालिका सुरु आहेत. यात प्रेक्षकसंख्या वाढविण्याकरीता अनेक मालिकेत वास्तव्यापलीकडचे दाखविले जाते. मालिकेतील पात्राच्या वागणुकीप्रमाणे अनेकांच्या प्रत्यक्ष जीवनात बदल झाल्याचे दिसून येत आहे. परंतू मालिकेतील भंपकपणा किंवा अवास्तवपणा ओळखून त्याचे आहारी न जाता त्याला धुडकावून लावले पाहिजे असेही अभिनेता जुवेकर यांनी यावेळी सांगितले.