लोकेश राहुल कसोटीतून बाहेर

0

गाले । दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार्‍या लोकेश राहुलचा आजारपणाने पिच्छा सोडलेला नाही. सलामीला खेळणार्‍या राहुलला आता ताप आला असून, त्यामुळे तो 26 जुलैपासून सुरू होणार्‍या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. बीसीसीआयने यासंदर्भात पत्रक काढून राहुल पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे राहुलला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्टइंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नव्हते.