लोकेश हॉस्पिटलचा 2 जुलै रोजी शुभारंभ

0

जळगाव । जामनेर येथील डॉ.अभिषेक फिरके, एम.डी. (मेडिसिन) यांच्या लोकेश हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ 2 जुलै रोजी सायंकाळी स्वातंत्र्य चौकात सुरू होणार्‍या रुग्णालयाचे उद्घाटन जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, डॉ. उल्हास पाटील उपस्थित राहणार आहेत.डॉ अभिषेक फिरके यांचे वडिल युवराज फिरके हे महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदावरुन निवृत्त झाले आहेत.

दोन वर्षाचा अनुभव पाठीशी
डॉ. अभिषेक यांचे शालेय शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल जामनेर येथे झाले. त्यांनी एम.बी.बीएस. कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय कराड येथे पूर्ण केले आहे. एम.डी. (मेडीसीन) एम.आय.एम.एस.आर. लातूर येथे पूर्ण केले आहे. त्यांच्या ई. एस.आय.पी. जी.आय.एम.एस.आर. अंधेरी येथे मेडिसीन आय.सी.यु.मध्ये रजिष्ट्रार या पदाचा 2 वर्षाचा अनुभव आहे.

त्यांच्या पत्नी डॉ. सौ. रेणुका ह्या एम.बी.बी.एस. झाल्यानंतर एम.डी. (पॅथोलॉजी) चे शिक्षणक घेत आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थारराईडचे आजार, दमा, फफुसाचे आजार, अर्धांगवायू, लिव्हर सिरॉसिस, मेंदु आजारावर या रुग्णालयात उपचार रुग्णांना मिळणार आहेत. अत्याधुनिक प्रशस्त जनरल वार्ड, स्पेशल रुम्स, सी.सी.टी.व्ही. सर्विलन्स, इर्न्व्हेटर बॅकअप, आपत्कालीन वैद्यकीय उपचार व सेवा या रुग्णालयात उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.