लोको पायलटसह गार्डच्या आरोग्याची काळजी

0

एनआरएमयुतर्फे होमिओपॅथी औषधांचे वितरण

भुसावळ– नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे भुसावळ मंडलातील रेल्वे कर्मचार्‍यांच्या आरोग्याप्रती सजग राहुन होमीओपॅथी औषधींचे वितरण करण्यात आले. तसेच लोको पायलटसह गार्डना मास्क आणि सॅनेटायझर देण्यात आले.

भुसावळ शहरातील रेल्वेच्या सीवायएम कार्यालयाच्या गुड्स लॉबीत कार्यरत अधिकारी व कर्मचार्‍यांना नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॅथी औषधींचे वितरण करण्यात आले. यावेळी वरिष्ठ परिचालन प्रबंधक डॉ. स्वप्नील निला, वरीष्ठ विद्युत अभियंता पी.के.मंज, मंडल सचिव कॉ. आर.आर.निकम, ईसीसी बँकेचे संचालक आर.पी. भालेराव, डॉ. संदीप बडगुजर उपस्थित होते. यावेळी डॉ. स्वप्नील आणि पी.के. मंज यांनी कोरोनाविषयी कर्मचार्‍यांना माहिती दिली. तसेच उपाययोजना आणि सुरक्षितता यावर मार्गदर्शन केले. संघटनेचे महामंत्री वेणु पी नायर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडीकल सॅनिटाईज कॅबीन, 450 गार्ड व लोको पायलट यांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. तसेच जिवनावश्यक वस्तुंचेही वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन शाखेचे सचिव खंबायत यांनी केले. आभार शाखेचे व्हा. चेअरमन प्रदीप गायकवाड यांनी मानले.

यांनी घेतले परिश्रम
या उपक्रमासाठी शाखा कोषाध्यक्ष शाम तळेकर, प्रदीप गायकवाड, संजय श्रीनाथ, किरण नेमाडे, अनिल मालविया, मो. असलम, एस.एस. वानखेडे, डी.आर. सयास, हरीमोहन, एच.के. चौरसिया, ए.व्ही. अडकमोल, पी.पी. जंगले, मिलींद चौधरी, सैय्यद सादीक, चेतन चौधरी, डी.जी.मोरे, योगेश विनंते, सचिन महाजन, बी.पी.पाटील, एस.डब्ल्यु अहिर, जे.के. साहु, सरबजीत सिंह, संदीप पाटील, अकबर अली, दिनेश भागवत, जे.एस. सोनवणे, राम प्रजापती, अतुल हांडे, योगेश व्यवहारे, पी. ए. सैतवाल, कमलेश शुक्ला यांनी परिश्रम घेतले.