लोक अदालतमध्ये 1 हजार 151 खटले निकाली

0

जळगाव । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघाच्या संयुक्तविद्यमाने शनिवारी राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 3 कोटी 32 लाख 31 हजार 275 रुपयांची तडजोडकरून 1 हजार 151 खटले निकाली काढण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली महालोक अदालत घेण्यात आली. महालोक अदालतीसाठी जिल्ह्यात एकूण 24 पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक पॅनेल मध्ये 1 न्यायाधीश आणि दोन सदस्य होते. महालोक अदालतीत कलम 138 चे धनादेश अनादरचे प्रकरणे, दिवाणी तसेच फौजदारी प्रकरणे, दरखास्तींचा निपटारा राष्ट्रीय महालोक अदालतीत शनिवारी करण्यात आला. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, बजाज फायनान्स, युनीयन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, देना बँक, जळगाव जनता सहकारी बँक, चोलामंडलम, कॉर्पोरेशन बँक यांचे खटलापुर्व आणि प्रलंबित प्रकरणे महालोक अदालतीत निकाली काढण्यात आले.