लोखंडी अवजड तिजोरीच चोरट्यांनी पोस्टातून लांबवली

Thieves stole a safe containing 22,000 rupees from the Nimbhora post office रावेर : तालुक्यातील निंभोरा गावातील पोस्ट कार्यालयातील तिजोरीच चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना 5 नोव्हेंबर रात्री 7.30 ते 6 रोजीच्या सकाळी सात वाजेदरम्यान घडली. तिजोरीत एकूण 22 हजार 690 रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री तिजोरी लांबवल्याचा संशय
निंभोर्‍याचे उपडाकपाल प्रभाकर मिठाराम चौधरी (भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, निंभोरा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारात पोस्ट कार्यालय आहे. पोस्टाची रक्कम सुरक्षितरीत्या ठेवण्यासाठी लोखंडी तिजोरी असून त्यात 22 हजार 689 रुपये किंमतीची रोकड, 980 रुपये किंमतीची पोस्टल ऑर्डर होती व चोरट्यांनी ही संधी साधून पाच हजार रुपये किंमतीची गोदरेज कंपनीची तिजोरीच लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निंभोरा पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पाहणी केली. तपास हवालदार विकास कोल्हे करीत आहेत.