लोखंडी गेट अंगावर पडल्याने बोदवडला एकाचा मृत्यू

0
भुसावळ : अंगावर लोखंडी गेट पडल्याने शहरातील एकाचा मृत्यू झाला. भिका भावडू पवार (42, रा.पोलीस ठाण्यासमोर, बाजारपट्टा, बोदवड) असे मयत इसमाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर गेट पडल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात व नंतर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. बुधवारी त्यांना बोदवड येथे आणल्यानंतर त्यांचा रात्री आठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी बोदवड पोलिसात विनोद तुकाराम पवार (बोदवड) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार दिनकर झायडे तपास करीत आहेत.