लोखंडी रॉडने मारहाण करुन तरुणाकडून 4 हजार व मोबाईल लांबविला

0

असोदा- भादली रस्त्यावरील थरारक घटना

दुचाकीवरुन रुमाल बांधलेले अज्ञात चोरटे

जळगाव- असोद्याहून दुचाकीवरुन भादली बु येथे घराकडे जात असलेल्या तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याच्याकडील 4 हजार रुपये असलेले पाकिट व मोबाईल असा एैवज लांबविल्याची थरारक घटना 11 रोजी रात्री 7.45 वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांनी तरुणाला धावत्या दुचाकीवरुन खाली पाडत त्याच्याकडील ऐवज लांबविल्याची माहिती मिळाली आहे.
भादली बुद्रूक येथील रितेश भागवत नारखेडे (वय 21) हा तरुण खाजगी कामासाठी दुचाकीने (क्र. एम.एच 19 सी.ई. 4177)शुक्रवारी असोद्याला गेला होता.

धावत्या दुचाकीवरुन तरुणाला ओढले
असोद्या येथून रात्री भादली बु. गावाकडे परतत असताना असोदा गावाच्या पाटचारीजवळ रात्री 7.45 वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांनी रितेशला धावत्या दुचाकीवरुन ओढले. यात रितेश दुचाकीसह खाली पडला.

‘तु बाईचे नाव घेतो’ म्हणत लांबविला एैवज
दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने खाली पडलेल्या रितेशला जवळील लोखंडी रॉडने मारहाण करण्यात सुरुवात केली. झटापट होत असताना त्याने रितेशला धरुन ठेवले. तेवढ्यात संशयिताच्या साथीदाराने रितेशला ’तु बाईचे नाव घेतो’ असा दम भरत त्याच्या खिशातील पाकिट त्यात 4 हजार रुपये होते व मोबाईल लांबविला. यानंतर भामटे पसार झाले. मारहाणीत रितेशला दुखापत झाली आहे.

पोलीस उपनिरिक्षकांकडून पाहणी
12 रोजी सकाळी रितेश हा तक्रार करण्याासाठी तालुका पोलिसात आला. त्याच्या तक्रारीवरुन 2 अज्ञातांविरोधात जबरी लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस निरिक्षक दिलीप भागवत व पोलीस उपनिरिक्षक कदीर तडवी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.