जळगाव। भांडणात का पडला? असा जाब विचारत एकाने तरूणांच्या डोक्यात पोते उचलण्याचे हुक मारून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास तांबापूरा पसिरातील जुम्माशहा यांच्या लाकडाच्या वखारीजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारहाण करणार्या इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबापुरा भागातील गवळीवाडा येथील सुभाष नारायण हटकर (वय-39) हे मंगळवारी जुम्मा शहा यांच्या वखारीजवळ उभे असतांना रात्री 8.45 वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी जावेद यासीन खाटीक हा त्या ठिकाणी आला. तीन ते चार दिवसांपूर्वी माझ्या व नातेवाईकांमध्ये झालेल्या भांडणात तु का पडला असा जावेद याने सुभाष यास जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. जावेद याने सुभाषला बेदम मारहाण करीत त्याच्याजवळ असलेले पोते उचल्याचे लोखंडी हुकाने सुभाषच्या डोक्यात वार केला. यात सुभाष हा गंभीर जखमी झाला. यानंतर सुभाषवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी सुभाष हटकर यांच्या फिर्यादीवरून जावेद यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.