लोटगाड्याधारकांना साक्री पोलिसांनी बजावल्या नोटीसा

0

साक्री । शहरातील बसस्थानक रोडवरील लोटगाड्याधारकांना साक्री पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. या रस्त्यावर नेहमी रहदारी निर्माण होत असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या कडेला लोटगाड्या लावल्या जात असल्यामुळे नोटीसा बजावल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्गापासून बसस्थानकापर्यंत दोन्ही बाजुने दुचाकी रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. दुचाकी वाहनांवर पोलिसांकडून कार्यवाही केली जात नाही मात्र रोजीरोटीसाठी व्यवसाय करणार्‍या लोटगाडीधारकांवर उपासमारीची वेळ आणण्यासाठी साक्री पोलिसांकडून कार्यवाही केल्याचे काही लोटगाडीधारकांनी सांगितले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्यापारी, दुकानदार आहेत. त्यांच्याकडे येणार्या ग्राहकांच्या मोटारसायकली असतात तर काही मोटारसायकली ह्या व्यापारी व दुकानदारांच्या असल्याने दिवसभर ही मोटारसायकली लावल्या जातात. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी निर्माण होते. बसस्थानक परिसरात व रस्त्यावर मोटारसायकलीमुळेच रहदारी निर्माण होते. त्यांच्यावर ही कार्यवाही केली पाहिजे. त्यामुळे रहदारी निर्माण होणार नाही.