लोडएक्सवन चालकांना करणार संघटीत

0

पत्रकार परिषदेत दिली माहिती

पिंपरी : माल वाहतूक क्षेत्राचे देश विकासात मोठे योगदान आहे. मात्र सध्या माल वाहतूक क्षेत्राला मरगळ आलेली आहे. ही मरगळ दूर करण्यासाठी आणि चालकांच्या उन्नतीसाठी लोड एक्सवन या संस्थेने देशभरातील 40-50 लाख वाहन मालक-चालक संघटीत करून त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. ट्रक चालक मालकांसाठी अच्छा दाम, अच्छा काम, अच्छा नाम ही कार्यप्रणाली विकसित केली आहे. ही कार्यप्रणाली जगात प्रथमच आपण विकसित केल्याचा दावा लोडएक्स वनचे संचालक मनोज बक्षी, आशिष राठी, परिन पारेख यांनी पत्रकार परिषदेत केला.

व्यवयाय मिळत नाही
मनोज बक्षी म्हणाले की, नोंदणीनुसार आज देशात अडीच टन क्षमतेच्या वरचे 95 लाख ट्रक आहे. यापैकी 1- ते 10 ट्रक असलेले 94 % ट्रकर्स आहे. यामध्ये 40-50 लाख तरुण चालक आहे. छोटे वाहतूक व्यावसायिक कर्जे काढून ट्रक खरेदी करतात. ट्रकर्स व ग्राहक यांच्यापेक्षा दलाल मोठे झाले. कमी ट्रक असलेल्या ट्रकर्सना आज व्यवसाय मिळत नाही. कारण त्यांना कोणत्या मार्गावर भाडे असेल याची माहिती नसणे, रेट, व्यवसायिक भांडवला अभावी माल वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आला.मात्र भविष्यात सुमारे 70% माल वाहतुकीचा व्यवसाय आम्ही मिळवून देणाऱ असून यासाठी देशातील बड्या 28 संस्थांशी संबंध प्रस्थापित केले आहे.

शेतीमालासाठी प्राधान्य देणार
आशिष राठी म्हणाले की, आम्ही दूध, मद्ययुक्त उत्पादने, वाळू, पाणी या क्षेत्रात आम्ही सेवा देणाऱ नाही. शेतीच्या माल वाहतुकीसाठी अधिक प्राधान्य देनार. ट्रकर्सला माल वाहतुकीचे काम देणार्‍या 3 हजार कंपन्या आमच्या संपर्कात आहे. सर्व चालक मालकांना एकत्र जोडण्यासाठी एक कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर ही कार्यप्रणाली आहे. संघटनात्मक कार्य पद्धत, तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरणपूरक हे या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्ये आहे.

चालकांचे जीवनमान उंचावेल
सध्या लोडएक्स वन सोबत एका महिन्यात सुमारे 27 हजार ट्रक जोडले गेले. यामुळे चालकांना रोजगारातून स्वावलंबी जीवन जगता येईल. जीवनमान उंचावेल. बेरोजगारी कमी होईल. चालकांना समजात एक प्रतिष्ठा मिळेल. चालकांना अत्यल्प दरात निवास व भोजन, सुरक्षा व प्रथमोपचार, तपासणी, या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी देशभरात 84 निर्मोह शेल्टर्सची उभारणी केली जाणार आहे.