अमळनेर । तालुक्यातील लोढवे येथील स्व.एस.एस. पाटिल माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सदरची आरोग्य तपासणी केली. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.गणेश पाटिल, डॉ तनुश्री फडके यांनी आरोग्य तपासणी तसेच वैयक्तिक स्वच्छता, कुष्ठरोग तपासणी, आहार याबाबत समुपदेशन केले. त्यांना वैशाली पाटिल, सुवर्णा राजपूत यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.