लोणखेडा येथे युनियन बँकेचे एटीएम फोडले

0
सव्वातीन लाखांची रोकड लंपास ; पोलिसांची धाव
शहादा :- तालुक्यातील लोणखेडा गावातील युनियन बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तीन लाख 12 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम फोडल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुन्हा गँग सक्रिय !
जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह किनगाव व अट्रावल येथे काही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून लाखोंची रोकड लांबवत पोबारा केला. पुन्हा याच पद्धत्तीने टोळी तर सक्रिय झाली नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.