शहादा- लोणखेडा, ता.शहादा येथील अंबाजी नगरमधील चार घरावर वीज कोसळल्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तु जळाल्याने जवळपास ४० हजार रुपयाचे नुकसान झाले. लोणखेडा येथे रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक वादळी पाउस सुरु झाला. दत्तु मंगळु पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ते कुटुंबासह घरात टी. व्ही.पाहत बसलेले असताना पावसाचे वातावरण होवुन विद्युत पुरवठा खंडीत झाला. टी. व्ही बंद करुन ते बसले असता अचानक विजेचा कडाडण्याचा मोठा आवाज झाला.
असे झाले नुकसान
घरातून बाहेर आल्यानंतर घरावर मोठा अग्नितांडव सुरु होता. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती व त्याच वेळी डिश टीव्हीचा कॅमेरा फुटल्याचा मोठा आवाज झाला व डीश टीव्हीची वायर संपुर्ण पणे जळुन तुकडे तुकडे झालेत व नंतर घरातील इनव्हर्टर टी. व्ही , दोन पंखे तर शेजारील रतिलाल जगन्नाथ पाटील यांचा घरातील टी. व्ही , इनव्हर्टर व दोन पंखे , व काशीनाथ विठ्ठल पाटील यांचे इनव्हर्टर व एक पंखा तर पुष्पेंद्र मधुकर पाटील यांचा एक पंखा म्हणजे एकूण तीन इनव्हर्टर बाजार भाव किमत १५ हजार , सहा पंखे ९ हजार , व दोन एल जी कंपनीचा टी. व्ही १५ हजार व डीश टीव्ही कॅमेरा साधारण पंधराशे रुपये असा साधारण चाळीस हजार रुपयापर्यंत नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पण याबाबत कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांने तिथे भेट दिली नसल्याचे व सरकारी दप्तरी नोंद नसल्याची माहिती दत्तु मंगळु पाटील यांनी दिली. चारही घरातील लोक त्यांच्या उदरनिर्वाह हा शेतीवर करतात . शेतकऱ्यांसाठी पाऊस येणे ही सुखावह घटना असतांना अचानक पणे त्यांना या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत मिळावी अशी देखील मागणी आहे.